नका बोलो शब्द वावगे
1025.
नका बोलो शब्द वावगे विवाद ।
आठवा गोविंद ध्यानी मनी ॥१॥
सकळही तुमचे होईल कल्याण
जरी गाल गाणे विठोबाचे ॥२॥
लटिकाचि बडिवार बोलो जाल वाचा ।
तरि होईल काळाचा अति क्रोध ॥३॥
निळा म्हणे पहा विचारुनी दृष्टी ।
धरा पोटी होईल ते ॥४॥
