वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 60. दत्तनाममहिमा - अभंग १००८ ते १०५५

दत्त माझी माय । आम्ह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087910 · अभंग क्र. १०२०

1020.
दत्त माझी माय । आम्हा अनाथांची गाय ॥१॥
प्रेमपान्हा पाजी वेगी । गुरुमाउली आम्हालांगी ॥२॥
आम्हा प्रीतीची साउली । श्रीगुरु दत्तराज माउली ॥३॥
आमची जीवींची जीवलगी । आम्हांलागीं घे वोसंगीं ॥४॥
एका जनार्दनी । दत्तराज मायबहिणी ॥५॥
१०२१
दत्त माझी माय । आम्हा सुखा उणें काय ॥१॥
नित्य प्रीति दत्तनामीं । दत्त वसे गृहरामीं ॥२॥
दत्ताविण नसे दुजे । दत्त मायबाप माझे ॥३॥
दत्तात्रय दत्तात्रय । नाही कळिकाळाचे भय ॥४॥
एका जनार्दनी दत्त । नित्य देख हृदयांत ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग