वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

मग सारोनी संध्यस्नान

🙏 4. संत नामदेव · ABH-081656 · अभंग क्र. १०३१

1031.
मग सारोनी संध्यस्नान| देवभक्ति विष्णुपूजन|पंक्ति आदरिले आपोशन| मागुती भोजन करिताती॥१॥
धन्य धन्य तू ज्ञानराजा| तू आवडलासि केशिराजा|पंक्ति करोनि द्विजा| वाढितसे रुक्मिणी॥२॥
राही रुक्मिणी सत्यभामा| वाढिती पंचामृत उत्तमा|पुंडलिक बोलावुनि साउमा| ज्ञानदेवा पंक्ति बैसविलें॥३॥
निवृत्ती सोपान मुक्ताबाई| गोपाळ देव्हढे दोन्ही बाहीं|रुक्मिणी सत्यभामा राही| वाढिती अन्ने नानाविधें॥४॥
वैष्णव प्रेमळाचे पंक्तीं| प्रार्थना करितसे श्रीपति|सोपान ज्ञानदेव निवृत्ती| एकवट बैसविलें॥५॥
गरुड तिष्ठत होता द्वारीं| त्यासी रुक्मिणी ताट करी|मग गर्जिन्नले जैजैकारीं| गोविंद श्रीराम उच्चारे ॥६॥
देव आकाशी पाहाती|ब्रह्मादिक वंचलो म्हणती|भाग्य केवढे यांचे क्षिती| या भक्तजनांचें॥७॥
नामा म्हणे आळंकापुर| धन्य धन्य मनोहर|आपण येउनि सारंगधर| समाधि देती ज्ञानदेवा॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग