वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

तंव विनवी ज्ञानदेव|

🙏 4. संत नामदेव · ABH-081655 · अभंग क्र. १०३२

1032.
तंव विनवी ज्ञानदेव| सकळांचा जाणोनी ठाव|शुद्ध भक्ति प्रेमळ वैष्णव| सर्वभाव सख्य घेतां॥१॥
बैसोनिया एक आसनी | देवभक्त चक्रपाणि|तांबुल घेवोनिया वदनीं| सुखसंतोषे बोलती॥२॥
मग पाचारिला गरूड|भक्त पुंडलिक प्रौढ|भक्त सोपान गम्यगूढ| जाणते भक्त॥३॥
केले प्रयाणासि मुहूर्त| पंढरीस जावयाचे आर्त|संवत्सरा जाऊनि त्वरित| समाधि देऊ सोपाना॥४॥
ऐसा निर्धार करूनि| समस्ता भोजने सारूनि|सिद्ध जाली माता रुक्मिणी| दिन अस्तमाना गेला॥५॥
जावोनी तया पुष्पकावरी| शयन आरंभिले हरी|नारद त़ुबर वेकुंठाभीतरीं| मंजुळ सुस्वरी गातसे॥६॥
भक्त भागवत भाग्याचे| तीही जयजयकार केला वाचे|ऐसे चतुर पाहार निशींचे| जागरण हरीचे कर्मिलें॥७॥
नामा म्हणे निघता हरी| ज्ञानदेवो प्रार्थना करी|देवा तूंचि वैकुंठहरी| आमचा ह्रदयस्थु॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग