विठ्ठल रुक्मिणीसहित
1040.
विठ्ठल रुक्मिणीसहित गरुड हनुमंत | आणिक संत महंत जमा जाले ॥१॥
परिसा भागवत नामा पुंडलिक | पताका सहित उठावले ॥२॥
गंधर्व आणि देव आले सुरगण | चालली विमाने आळंकापुरी ॥२॥
लहान थोर सारे आले ऋषीश्वर | उतरले भार वैष्णवांचे ॥४॥
नामा म्हणे देवा दिसती तांतडी | जाती मज घडी युगा ऐसी ॥५॥
