वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

कर जोडोनिया पुढे | ल

🙏 4. संत नामदेव · ABH-081664 · अभंग क्र. १०२१

1021.
कर जोडोनिया पुढे | लोटांगण टाकिले गाढे |म्हणे स्तवन करावया मी वेडे | काय जाणे तुझा महिमा ॥१॥
तरी पांडुरंग तू दयाळु | भक्त भाविका कृपाळु |भीमातटी उभा गोपाळु |पुंडलिका कारणे ॥२॥
चंद्रभागा सरोवरी | निरे भीवरेचा तिरी |वाट पाहसी हरी | भक्तसह्या करणे ॥३॥
तरी उदार शूर महिमेचा | खुंटलिया चारी वाचा |तेथ पवाडु मज कैचा | वर्णावया सामर्थ्य ॥४॥
शेषा ऐसा स्तुती करी | तया नाकाळसीच श्रीहरि |जिव्हा चिरलिया भग्नधारी | मग मौन्येंचि राहिला ॥५॥
तो तू अलंकापुरी येसी |मज दीना समोखिसी |देव म्हणे तू होसि | साक्षात ज्ञानरूप ॥६॥
ज्ञानदेवो साक्षात नाम तुझे | ते ज्ञान हृदयींचे माझे |हे जन तारावया काजे | तुवा अवतार घेतला ॥७॥
नामा म्हणे देव हरी | पुढतो पुढती साहाकारी |वर देऊनि अंगिकारी | आपणची जाला ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग