वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 150. नमन

नित्य अनुष्ठान ये ती

🙏 4. संत नामदेव · ABH-081657 · अभंग क्र. १०२४

1024.
नित्य अनुष्ठान ये तीर्थी| त्याचे पूर्वज उद्धरिती|जे का अन्नदान करिती| ते पावती वैकुंठी ॥१॥
ऐसे तीर्थक्षेत्र सर्वोत्तम| आणिक नाही यांसी सम|शिवपीठ हे मनोरम| अळंकापुरी हे देख॥२॥
न वर्णवे येथिंची थोरी| जेथे साक्षात श्रीहरि|येऊंनिया झडकरी| ज्ञानदेवा समाधि दिधली॥३॥
अनंत पुण्य ज्याचे गांठी| तरीच ज्ञानदेव पडे दिठी|जोडे तप कोट्यानुकोटी| ऐसे धूर्जटी बोलिले॥४॥
सिद्ध साधकाचे स्थळ| सर्व तीर्थांचे हेंचि मूळ|वास केलिया सर्वकाळ| तरि महादोष हरतील॥५॥
अजान वृक्षातळी हरिकथा| नित्य जो नर करी तत्वता|तो न जाय यमपंथा| ऐसे जगन्नाथ बोलिले॥६॥
द्वारी सुवर्णाचा अश्वत्थ| नित्य पूजलिया स्वस्थ|लक्ष्मी न सांडी तया सत्य| सकळ आर्ती पूर्ण होती|॥७॥
नित्य प्रदक्षिणा सप्त| तरी अगाध पुण्य त्वरित|पूर्वज वैकुंठासी जात| बेचाळिसा सहित॥८॥
नित्य विष्णूचे पूजन| नित्य नाम संकीर्तन|नित्य वैष्णव संत भोजन| धन्य पावन इहलोकीं॥९॥
नामा म्हणे आळंकापूर| सर्व क्षेत्रामाजी मनोहर|पवित्रासी परम परिकर| त्रिभुवनी दुर्लभ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग