नेघो आम्ही कदा भुक्त
806.
नेघो आम्ही कदा भुक्ति आणि मुक्ति ।
हरिनामी विश्रांति सर्व जोडे ॥१॥
काय कराव्या त्या रिध्दी आणि सिध्दी ।
वाउग्या उपाधी भजना गोंवा ॥२॥
नलभे आम्हा काही मान्यता बहुमान ।
जेणे अभिमान खवळे अंगी ॥३॥
निळा म्हणे दुरी दुरावू जाणीव ।
नलगे शहाणीव नाडील ते ॥४॥
