वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

जो देवांचे पद सोडी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087563 · अभंग क्र. ८०४

804.
जो देवांचे पद सोडी । सदा गोडी अंतरी ॥१॥
पापें पळती रामनामे । खंडताती कर्माकर्मे ॥२॥
नामे कळिकाळासी धाक । यमदुता न मिळे भीक ॥३॥
ऐसा नामाचा महिमा । नाही आणिक उपमा ॥४॥
आवडी जो नाम गाय । एका जनार्दनी वंदी पाय ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग