नाम मुखी सदा वाचे ।
812.
नाम मुखी सदा वाचे । कांपती कळीकाळ साचे ॥१॥
दो अक्षरीं रामनाम । जपतां पावसी मोक्षधाम ॥२॥
नामावांचूनि परिपाठी । साधन नाही नाही नेहटीं ॥३॥
नाममंत्र श्रेष्ठ सार । जड जिवांसी उद्धार ॥४॥
एका जनार्दनी नाम । सुखधामाचा विश्राम ॥५॥
