कलीमाजी सोपे घेता रा
810.
कलीमाजी सोपे घेता रामनाम । नाही कांही श्रम जपतप ॥१॥
न लगे साधन पंचाग्री धुम्रपान । नामेंचि पावन युगायुगीं ॥२॥
योगयाग यज्ञ न लगे वेरझारा । नाममंत्र पुरा जप आधी ॥३॥
एका जनार्दनी निश्चयो नामाचा । तेथे कळिकाळाचा रीघ नाही ॥४॥
