वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

काळा पै गोवळु काळासी

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074532 · अभंग क्र. ८१३

813.
काळा पै गोवळु काळासी अलोट ।
नामामृते पाठ भक्ता देही ॥
नित्य सुख आम्हा तपांचिया कोडी ।
न लगती परवडी व्रते तीर्थे ॥१॥
सुलभ सोपारा सर्वांघटी अससी ।
साधुसंगे दिससी आम्हा रया ॥२॥
चैतन्याशेजारी मन पै मुराले ।
सांवळे सानुले हृदयघटी ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलराज ।
निवृत्तीने बीज सांगितले ॥३॥

अर्थ :
जो भगवान श्रीकृष्ण तो स्वरुपाने काळा असून जगाचे भक्षण करणारा जो काळ त्या काळाचाही काळ आहे. अशा श्रीकृष्णाच्या नामामृताचा पाठ भक्तांच्या हृदयांमध्ये असल्यामुळे ते नेहमी सुखी आहेत. त्या सुखाकरिता कोट्यवधी तपे अगर व्रते अथवा तीर्थे भक्तांना करावे लागत नाही. सर्व जीवमात्रामध्ये सहज रितीने भरलेला तू साधुसंगतीने आम्हाला स्पष्ट दिसतोस. तुझ्या चैतन्यरुप बिछान्याच्या ठिकाणी आम्हा भक्ताचे मन मुराले. त्यामुळे अंतःकरणरुपी घटांत तुझे सांवळे व सकुमार लहानरुप स्पष्ट दिसत आहे. अशा त-हेचा परमात्मा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल हाच सर्व जगाचे बीज आहे. असे श्रीगुरु निवृत्तिरायांनी आम्हास सांगितले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग