भवसिंधुचा पार तरावया
810.
भवसिंधुचा पार तरावयालागी । साधन कलियुगी आणिक नाही ॥१॥
अहनिंशी नाम जपा श्रीरामाचे । सकळ धर्माचे मुगुटमणी ॥२॥
न चले वर्णाश्रम धर्म आचरण । न घडे व्रत दान तप कोणा ॥३॥
नव्हे तीर्थाटन पुराण श्रवण । नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध ॥४॥
नव्हे ध्यान स्थिती भावेंविण वोजा । न घडे देवपूजा एकनिष्ठ ॥५॥
नामा म्हणे नाम राघोबाचे गाता । ब्रह्म सायोज्यता घर रिघे ॥६॥
