वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

तुटे मायाजाळ विघडे भ

🙏 4. संत नामदेव · ABH-083361 · अभंग क्र. ८११

811.
तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरी लागे छंदू हरिनामाचा ॥१॥
येर कर्मधर्म करिता या कली । माजी कोण बळी तरला सांगा ॥२॥
न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥३॥
नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥
न साधे हा योग न करवे वैराग्य । साधा भक्ति भाग्य संतसंगे ॥५॥
नामा म्हणे साधन न लगे आणिक । दिधली मज भाक पांडुरंगे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग