नुरवूनि दुसरे आता ठे
805.
नुरवूनि दुसरे आता ठेलो चरणी ।
नित्यानंद भोगीतुंचि दिनरजनी ॥१॥
आळवूनि वाचे याची उत्तम नामे ।
सारिन काळ याचिपरि सुखसंभ्रमे ॥२॥
धरुनिया रुप दृष्टी हदयभुवनी ।
सांठवीन आपुलिया मनाचे मननी ॥३॥
निळा म्हणे जन्मोनिया केली हे जोडी ।
विठोबाचि सेवा नित्य नविये आवडी ॥४॥
