जया हेत नामी ध्यास ।
809.
जया हेत नामी ध्यास । नेणे आणिक सायास ।
कोण लेखी संसारास । नामापुढे तृणवत ॥१॥
आम्हा नामाचे भूषण । नामे सुखासी मंडण ।
नामे होतसे खंडण । नानापरी पापांचे ॥२॥
जपतां नाम मंत्रावळी । काळ कांपतसे चळी ।
एका जनार्दनी नव्हळी । रामनामे अतर्क्य ॥३॥
