कलियुगीं नाम सोपे ते
811.
कलियुगीं नाम सोपे ते सुजाण । ऐशी भाषा जाण बहुतांची ॥१॥
वाल्मिक सांगतु रामनाम जपा । तरले तरती सोपा राममंत्र ॥२॥
पुराणकर्ता तो व्यास मुगुटमणी । म्हणे रामकृष्ण वदनी सोपा मंत्र ॥३॥
बहुतांच्या मते एका जनार्दनी । रामनाम वाणी गाय सदा ॥४॥
