वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

नीत नवा प्रेमा कृपेच

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088737 · अभंग क्र. ८०३

803.
नीत नवा प्रेमा कृपेचिया बळे ।
अंतरी हा वोळे आनंदघन ॥१॥
नाचती मयूरे रोमांचीत दाटी ।
अमृताची वृष्टी जीवनकळा ॥२॥
आकाशे दुमदुमी गर्जे अनुहत ।
सुनीळ तळपत विदयुल्लता ॥३॥
पिकली भूमिका बीज आले फळा ।
अव्दय निजकळा सवंगिले ॥४॥
भाग्यवंत निळा सांठवी निराळी ।
आत्मया जवळी निकटवासे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग