मायेचा कळवळा मायाची
804.
मायेचा कळवळा मायाची जाणे|तैसे मी तान्हे माऊलिये॥१॥
विठ्ठल श्रीरंग डोळस प्रसन्न|नित्य अमृतघन वोळला सदा|२|
जननी जनक तूंचि वो मुकुंद|नाम हे गोविंद शुद्धरसु॥३॥
येई वो केशवे नित्य नामरूपें|मी तुज आलापे आळवित॥४॥
माधवा श्रीधरा वेगी येई त्वरे|मज वो नावरे प्रेमवेधु॥५॥
नामा म्हणे तू जीवन आमुचें|नित्य केशवाचे प्रेम मज॥६॥
