न पडे विसर याचा मना
795.
न पडे विसर याचा मना ।
झाली तद्रुप वासना ।
मही व्यापूनिया गगना ।
दिसे नयना रुप पुढे ॥१॥
जे जे आढळे दृष्टीपुढे ।
ते ते याच्या स्वरुपे मांडे ।
व्यापुनी सकळांमाजिवडे ।
वसे अंतरी सकळाचे ॥२॥
स्वरुप सांवळे सगुण ।
अंगकांति मेघवर्ण ।
करी धरुनिया जघन ।
दृष्टी अवलोकी पुंडलिका ॥३॥
कर्णी कुंडले विशाळ डोळे ।
जैसी विकासली दिव्य कमळे ।
हदयावरी कंठमाळे ।
पदकी रत्ने झळकती ॥४॥
कास पितांबरे घातली ।
मेखळा कटी सूत्रे रेखिली ।
पाउले विटेवरी शोभली ।
निळया झाली प्रसन्न ती ॥५॥
