श्रीरामानामें तुटती
801.
श्रीरामानामें तुटती यातना । म्हणोनि रामराणा दृढ धरा ॥१॥
यमाची यातना तुटेल निर्धारे । चुकतील फेरे चौर्याशींचे ॥२॥
जन्ममरणाचा तुटेल तो बोध । ठसावतां बोध रामनाम ॥३॥
एका जनार्दनी नामापरतें थोर । नाही नाही निर्धार केला व्यासें ॥४॥
