वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

मुखें गावें नाम । ते

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087636 · अभंग क्र. ७९५

795.
मुखें गावें नाम । तेणे पुरें सर्व काम ॥१॥
सर्व साधनांचे सार । तेणे पावे पैलपार ॥२॥
नामे बहुत तारिले । महा दोषी उद्धरिले ॥३॥
रामनाम बहु श्रेष्ठ । घेता न लगती कष्ट ॥४॥
नाम नित्य ज्याचे मुखी । तो जाणावा सर्वसुखी ॥५॥
रामनाम हेंसी सार । सत्य जाणा हानिर्धार ॥६॥
रामनाम निरसी ताप । पापें जाती आपेआप ॥७॥
रामनाम जो उच्चारी । सुख पावे तो संसारी ॥८॥
एका जनार्दनी नाम । पावविते परमधाम ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग