वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

तुझी गुण कीर्ति ऐकोन

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074560 · अभंग क्र. ८०६

806.
तुझी गुण कीर्ति ऐकोनी आर्ते मन उचंबळले ।
आलिंगना धाविन्नले उतावीळ ॥१॥
तनु मनु विगुंतले मन वाचा गुंतले ।
मी माझे विसरले दर्शन गे माये ॥२॥
उतावेळपणे भुजा दंड उचलले ।
नेणोनी ठकले ठेले रूप पाहातांची बाईये ॥३॥
पातिया पाते नलगे पाहाणे तेचि ठेले ।
तैसे बापरखुमादेविवरे विठ्ठले केले गे माये ४॥

अर्थ :
हे श्रीकृष्णा संताच्या मुखाने तुझे गुण व कीर्ति ऐकल्यामुळे तुझ्या भेटीविषयी माझ्या मनांत एवढी उत्कंठा लागली आहे की धावत येऊन तुला केव्हा आलिंगन देईन असे मला वाटते. अशा उत्कट इच्छेमुळे माझे मन व वाणी तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी निमग्न होऊन माझ्या ठिकाणचा देहभाव नाहीसा झाला. मनाने तुला आलिंगन देण्याच्या उतावीळपणाने बाहु उचलले पण तुझ्या यथार्थ स्वरूपाचा विचार करता तुझे तसे स्वरूप नसल्यामुळे माझे ते उचललेले बाहु ठकले. डोळ्यांची टक लावून तुझ्या स्वरूपास पाहाणे हेही थांबले कारण तुझे स्वरूप डोळ्यांनी पाहण्याचा विषय नाही. याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यानी माझी अशी स्थिति केली असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग