जळाचा जळबिंदु जळींच
797.
जळाचा जळबिंदु जळींच तो विरे| तैसे हे विघरे पांचा ठायी ॥१॥
जिव शिव हे उच्चार नाम हे मधुर| जिव्हेसी उच्चार रामनाम ॥२॥
रामनाम त रक शिव षडाक्षरी|तैसी वाचा करी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम| मंत्र हा परम रामनाम॥४॥
