फुटले धरण आला लोंढा
812.
फुटले धरण आला लोंढा ।
नावरे तोंडा माझिया तो ॥१॥
कृपाघने वृष्टी केली ।
वाचा गर्जिन्नली बोधवरे ॥२॥
प्रतीति विदयुल्लता झळकती ।
थेंबुटे पडती ब्रम्हरसे ॥३॥
निळा म्हणे पिकले पीक ।
आले सकळीक भागासी ते ॥४॥
812.
फुटले धरण आला लोंढा ।
नावरे तोंडा माझिया तो ॥१॥
कृपाघने वृष्टी केली ।
वाचा गर्जिन्नली बोधवरे ॥२॥
प्रतीति विदयुल्लता झळकती ।
थेंबुटे पडती ब्रम्हरसे ॥३॥
निळा म्हणे पिकले पीक ।
आले सकळीक भागासी ते ॥४॥