वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

डोळियाचाही डोळा बुध्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088793 · अभंग क्र. ७९०

790.
डोळियाचाही डोळा बुध्दी ।
माझी उघडूनिया कृपानिधी ।
देखणी करुनिया त्रिशुध्द ।
निजात्मपदी स्थापिली ॥१॥
तेणे दिसती ठाया ठावो ।
हदय सकळाचेही भाव ।
संत दावी जे अनुभव ।
आणखीही सर्व मायाकृत ॥२॥
नवल कृपेची हे जाती ।
फिटली मोह ममता भ्रांती ।
उत्पत्ति स्थिती प्रळय होती ।
ते ते निगुती आटले ॥३॥
देखणे झाले नयनानयन ।
देखती आपुलेही वर्तन ।
राहिले ठायीच ते जडोन ।
अभेद होऊन देखती ॥४॥
निळा स्वामी सद्गुरुनाथा ।
देखणा तूचि मी नाही आता ।
तोडूनी मी हे माझी ममता ।
आपण आतौता मेळविलो ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग