जाणोनिया मनींचा हेत
783.
जाणोनिया मनींचा हेत ।
केले सनाथ मजलागी ॥१॥
कृपावंत संत सद्गुरु ।
भवार्णव तारुं मजलागी ॥२॥
बोलविली आरुषवाणी ।
श्रीहरिच्या गुणी आपुलिये ॥३॥
निळा म्हणे नवलचि केले ।
अंकिता गौरविले निज अंकी ॥४॥
783.
जाणोनिया मनींचा हेत ।
केले सनाथ मजलागी ॥१॥
कृपावंत संत सद्गुरु ।
भवार्णव तारुं मजलागी ॥२॥
बोलविली आरुषवाणी ।
श्रीहरिच्या गुणी आपुलिये ॥३॥
निळा म्हणे नवलचि केले ।
अंकिता गौरविले निज अंकी ॥४॥