उपदेश सुगण आईक रे एक
776.
उपदेश सुगण आईक रे एक|नाम हे सम्यक विठ्ठलाचें॥१॥
जनी जनार्दन भावचि संपन्न|विठ्ठल उद्धरण कलीमाजी़ं॥२॥
साधेल निधान पुरेल मनोरथ|नामेंचि कृतार्थ होसी जना॥३॥
नामा म्हणे नाम घेई तू झडकरी|पावसी निर्धारी वैकुंठपद ॥४॥