गोमटे पाय देखिले दिठ
777.
गोमटे पाय देखिले दिठी ।
समान नेहटी वीटेचिये ॥१॥
तैंचिपासुनी लागला छंद ।
याचिया वेध स्वरुपाचा ॥२॥
कटांवरी कर तुळसीमाळा ।
चंदनाचा टिळा मुगुट माथा ॥३॥
निळा म्हणे वेढिले वसन ।
विदयुल्लते समान तेज त्याचे ॥४॥
777.
गोमटे पाय देखिले दिठी ।
समान नेहटी वीटेचिये ॥१॥
तैंचिपासुनी लागला छंद ।
याचिया वेध स्वरुपाचा ॥२॥
कटांवरी कर तुळसीमाळा ।
चंदनाचा टिळा मुगुट माथा ॥३॥
निळा म्हणे वेढिले वसन ।
विदयुल्लते समान तेज त्याचे ॥४॥