स्नानाचा परिकळा स्वर
778.
स्नानाचा परिकळा स्वरवण अडथळा । सकळ मंत्री साचा पाही ।
आसनी शयनी भोजनी गमनागमानीं । राम म्हणता दोष नाही ॥१॥
श्रीराम जयराम श्रीराम जयराम । जपतां हे दो अक्षरीं नाम ।
संसारातें दळसी कळिकाळा ते कढसी । निरसेल कर्माकर्म ॥धृ.॥
योग याग तपें तपताती बापुडे । जन धन शिणताती वेडे ।
निःशंक निर्लज्ज हरिनाम गाता । पायवाट वैकुंठां चढें ॥२॥
गूढ गुह्मा जपसी वाचे श्रीराम । ते नामे जपाचा भावो ।
तेणे नामे भुलला वैकुंठ सांडुनी । कीर्तनी नाचतो देवो ॥३॥
रामनामे वाचा गर्जती उठी । अमर येती त्याच्याभेटी ।
तीर्थीचे समुदाय अघ्रिरेणु वांछिणी । श्रुति ऐको ठाती गोठी ॥४॥
सकल साधनामांजी वरिष्ठ हे भावे । जपा रामनाम ।
एका जनार्दनी संतोषला तो । पुरविल निष्काम काम ॥५॥
