चित्ती माझे पांडुरंग
779.
चित्ती माझे पांडुरंग ।
बैसला अभंग न ढळेसा ॥१॥
जाता दिवस जाता राती ।
स्वप्नी जागृती सुषुप्ती तो ॥२॥
देखता डोळा ऐकता कानी ।
बोलता वदनी तोचि पुढे ॥३॥
निळा म्हणे बुध्दीमन ।
गेली विरोन त्यामाजी ॥४॥
779.
चित्ती माझे पांडुरंग ।
बैसला अभंग न ढळेसा ॥१॥
जाता दिवस जाता राती ।
स्वप्नी जागृती सुषुप्ती तो ॥२॥
देखता डोळा ऐकता कानी ।
बोलता वदनी तोचि पुढे ॥३॥
निळा म्हणे बुध्दीमन ।
गेली विरोन त्यामाजी ॥४॥