तुझे तुज सांकडे पडले
785.
तुझे तुज सांकडे पडले थोर कोडें|ते करी माजीवडे ब्रह्मार्पण॥१॥
ब्रह्म हरी ध्याई मन ठेवी ठायीं|विठ्ठलाच्या पायी दिननिशींं॥२॥
अनुभवग्रहणी विठ्ठल निशाणी|घडेल पर्वणी नित्यकाळ॥३॥
नामा म्हणे सुघड मन करी वाड|इंद्रियाची चाड धरू नको॥४॥
