नाशिवंत सर्व एक नाम
780.
नाशिवंत सर्व एक नाम साचे । म्हणोनि वदा वाचे श्रीराम ॥१॥
शरीर नासे संपत्ति नासे । नाम न नासे श्रीरामाचे ॥२॥
आकार नसे निराकार नासे । नाम नासे श्रीरामाचे ॥३॥
स्थुळ नासे सुक्ष्म नासे । नाम न नासे श्रीरामांचे ॥४॥
जे न नासे ते नाम वाचे । एक जनार्दनी साचे जप करी ॥५॥
