जिवाचाही जीव माझया श
784.
जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव ।
पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रिये ॥१॥
आईका हो श्रोते तुम्ही संत सज्जन ।
मी माझे हे जतन कोण करी यावरी ॥२॥
नयनाचेही नयन माझया घ्राण ।
श्रवणाचेहि श्रवण तोचि रसनेची रसना ॥३॥
त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा ।
बोलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥४॥
कराचेहि कर माझा चरणचे चरण ।
चैतन्याचे चैतन तोचि रसनेची रसना ॥५॥
त्वचेचीही त्वचा माझे वाचेची वाचा ।
बाकलविसी बोलचा तोची अर्थ तात्पर्य ॥६॥
कराचेहि कर माझया चरणाचे चरण् ।
चैतन्याचे चैतन्य तोचि मनांचे मन ॥७॥
निळा म्हणे भुक्ति मुक्ति विरक्ति ज्ञान ।
शांति क्षमा दया तोचि सिध्दी साधन ॥८॥
