वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

नको नको आळस करु । वा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087584 · अभंग क्र. ७९०

790.
नको नको आळस करु । वाचे श्रीराम उच्चारु ।
तेणे सुफळ संसारु । होय जनीं जाणिजे ॥१॥
का रे न करिसी उच्चार । किती सांगु तुज विचार ।
न धरसी निर्धार । मनामाजीं पामरा ॥२॥
जासी भलतीया वाटा । पडसी दारी आणि दरकुटा ।
नामावांचुनीं सुटका । एका जनार्दनी नोहेची ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग