वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

निरखित निरखित गेलीये

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074278 · अभंग क्र. ७७८

778.
निरखित निरखित गेलीये ।
पाहे तव तन्मय जालिये ॥१॥
उन्मनी मन निवाले ।
सांवळे परब्रह्म भासले ॥२॥
रुप येवोनिया डोळा बैसले ।
पाहे तव परब्रह्म अवतरले ॥३॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले ।
मूस ओतूनिया मेण सांडिले ॥४॥

अर्थ :
निरखित निरखित म्हणजे श्रवण, मनन, निजिध्यासन करीत, करित वा पंचकोशाचा निरास करीत करीत किंवा नामस्मरणादि भक्ति करीत करीत श्रीकृष्ण परमात्म्याला पहावयाला म्हणून गेले. तो त्याला पाहाताक्षणीच मी तद्रूप झाले. उन्मन जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन शांत होऊन तो सांवळा श्रीकृष्ण परब्रह्म भासला. त्याचे रुप माझ्या डोळ्यांत येऊन बसले. विचार करुन पाहिले तर परब्रह्मच माझ्या शरीरांत अवतीर्ण झाले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यानी माझ्या शरीरुपी मुसीत परमात्मस्वरुप ओतल्याबरोबर अनात्मभावाचे मेण सर्व नाहीसे होऊन गेले असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग