जाणीवचि माझी गिळूनि
782.
जाणीवचि माझी गिळूनि ठेला ।
नेणीवेते प्याला निपटूनिया ॥१॥
निढळवाणे मज करुनि ठेविले ।
जीवाचेही हरिले जीवपण ॥२॥
ज्ञानासी तो हा वाढोचि नेदी ।
ग्रासिल्या उपाधी परमार्थिका ॥३॥
निळा म्हणे येणे नेले आपपर ।
मोडियेली थार दोहिंकडे ॥४॥
