वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ९, श्री विठ्ठल प्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७५९ ते ७९०

कमळावरी कमळ ठेवुनी उ

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074255 · अभंग क्र. ७७७

777.
कमळावरी कमळ ठेवुनी उल्हाटे ।
कमळी कमळ उफाराटे गे माय ॥१॥
वासना निरसलिये वासना निरसलिये ।
ब्रह्मकमळी उगवलीये गे बाईये ॥२॥
कारण कामाते करुनी आपैते ।
महाकारण ते गगना परौते गे बाईये ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठल तेजसु ।
ब्रह्मकमळी दाविता प्रकाशु गे बाईये ॥४॥

अर्थ :
भगवान श्रीकृष्ण आपले चरणकमळ, दुसऱ्या चरणकमलावर ठेवून दिडक्या पायावर उभेआहेत. त्याकडे पाहून अंतःकरणातील वैषयिक वासना नाहीसी होऊन हृदय ब्रह्मकमळी ते श्रीकृष्णाचे चरण उगवले. त्यामुळे कारण शरीर म्हणजे व्यष्टी अज्ञान त्यात वैषयिक कामना त्याचे संस्कार सहजच असतात. त्याचा निरास केला असता महाकारणदेह म्हणजे परमात्मस्वरुप प्रगट होते. ही स्थिती गगनाच्याही पलीकडची आहे म्हणजे त्या स्वरुपांत सर्व अनात्मपदार्थाचा अभाव असतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते हृदयकमळामध्ये स्वरुपज्ञान दाखविणारे आहते असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग