तुजमाजी विरावे तुज ग
776.
तुजमाजी विरावे तुज गिळुनी राहावे ।
तुझे रूप पाहावे रुपेंवीण ॥१॥
तूते अवघे गुज म्या सांगावे ।
वाचेवीण बोलावे निःशब्दाकारे ॥२॥
रखुमादेविवरु वाचे विनविला ।
प्रसन्न जाला ब्रह्म दाउनी ॥३॥
अर्थ :
तुझ्या स्वरुपांत मी विरुन तुलाच गिळून टाकलें, दिसणाऱ्या रुपावांचून जे तुझे यथार्थ अरुपरुप आहे ते पाहावें. आणि असे तुझ्या स्वरुपाच गुह्य मी वाचेवांचून सांगावे. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते माझ्या वाणीने आळविले त्यामुळे ते प्रसन्न झाले व त्यानी ब्रह्म दाखविले. असे माऊली सांगतात.
