अकल्पित द्रुम आजी सं
788.
अकल्पित द्रुम आजी संयोगे घडले ।
अपार आपणाते विसरले गे माय ॥१॥
महुरले महुरले मन माझे मोहरले ।
भक्तिफळासी कैसे आले गे माय ॥२॥
देठीहुनी सुटले पुढती कैसे जीवनासी आले ।
बापरखुमादेविवर विठ्ठले ऐसे केले गे माये ॥३॥
अर्थ :
कल्पनातीत वृक्ष जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशी आत्मस्वरूपाचा ऐक्यरूप संयोग आज घडल्यामुळे आत्मस्वरूपाचे अपारपण मी विसरून गेले. अशा आत्मस्वरूपाविषयी माझे मन त्रिवार खचित आनंदी झाले हेच भक्तीचे फल माझे पदरांत कसे पडले. देवाहून म्हणजे परमात्मस्वरूपापासून ज्ञानाने भ्रमिष्ठ होऊन संसारात पडलेला जीव, पुन्हा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तयानी परमात्मस्वरूप कस केले. असे माऊली सांगतात.
