कोटी दिवाळया दसरे सण
774.
कोटी दिवाळया दसरे सण ।
घडले श्रीचरण देखिले ॥१॥
सकळही पर्वेव्रते जोडली ।
तुमची वंदिली पदांबुजे ॥२॥
आलिंगने शीतळ काया ।
निवाल्या बाह्या जीव प्राण ॥३॥
निळा म्हणे अवघींच अंगे ।
तुमच्या संगे सुस्नात ॥४॥
774.
कोटी दिवाळया दसरे सण ।
घडले श्रीचरण देखिले ॥१॥
सकळही पर्वेव्रते जोडली ।
तुमची वंदिली पदांबुजे ॥२॥
आलिंगने शीतळ काया ।
निवाल्या बाह्या जीव प्राण ॥३॥
निळा म्हणे अवघींच अंगे ।
तुमच्या संगे सुस्नात ॥४॥