वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › २. सार्थ अभंग ५०१ ते १०००

मातेची जो थाने फाडी

🙏 3. संत तुकाराम · ABH-078474 · अभंग क्र. ७७९

779.
मातेची जो थाने फाडी । तया जोडी कोण ते ॥१॥
वेदा निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥धृपद॥
अगी लावी घरा । मग वसती कोठे थारा ॥२॥
तुका म्हणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥३॥

अर्थ :
ज्या मातेच्या दुधापासून आपले रक्षण होते त्या मातेचे स्थन फाडणे जसे पापच आहे. त्याप्रमाणे वेदाला जो कोणी निंदितो तो चांडाळ, पापी, अज्ञानी आहे असे समजावे. जो स्वतः आपल्याच घरला आग लावतो तो कुठे विश्रांती घेणार ? तुकाराम महाराज म्हणतात वेदाचा वर्म जाणून घेतला पाहिजे इतरांना तर भ्रम नाचवितात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग