वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १५. आपल्या स्थितीसंबंधाने जनाशी उद्गार

जडला जीवी तो नव्हेचि

🙏 6. संत निळोबाराय · ABH-088728 · अभंग क्र. ७८०

780.
जडला जीवी तो नव्हेचि परता ।
चित्ती चिंता व्यापूनिया ॥१॥
बुध्दीमाजी याचेचि ठाणे ।
राहटे करणे अहोरात्री ॥२॥
अंत:करणी धरिला थारा ।
आंतु शरीरा बाहेरी हा ॥३॥
निळा म्हणे अवघाचि हरि ।
आम्हा घरी दारी दाटला ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग