वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

रामनामाचेनि बळे । ब्

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087659 · अभंग क्र. ७९२

792.
रामनामाचेनि बळे । ब्रह्मा सर्वत्रैक मिळे ॥१॥
रामनामाची ही ख्याती । कर्माकर्माची निवृत्ति ॥२॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । म्हणता प्रगटे परमानंद ॥३॥
जों जों उच्चारी नाम । तो तो प्रगटे मेघःशाम ॥४॥
व्रत तप यज्ञ दान । रामनामासी साधन ॥५॥
एका जनार्दनी कीर्तीं । सहज चैतन्य विश्रांती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग