भ्रमना पाउले वेचताती
776.
भ्रमना पाउले वेचतातीती वाव । प्रवेशाचा ठाव एका द्वारे ॥१॥
सार ती पाउले विठोबाची जीवी । कोणी न विसंभावी क्षणभरि ॥धृपद॥
सुलभ हे केले सकळा जीवन । फुंकावेचि कान न लगेसे ॥२॥
तुका म्हणे येथे सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचे ॥३॥
अर्थ :
सर्व साधनांच्या मागे फिरत राहण्यात भ्रमण करण्यात कायअर्थ : आहे हरी कडे जाण्याचे द्वार तर एकच आहे. सर्व गोष्टीचे सार म्हणजे विठ्ठलाचे पाऊले ते आपल्या हृदयात स्थिर करावी कोणीही त्याला एक क्षणभर विसरू नये. हे सर्वात सोपे व उत्तम साधन आहे. यासाठी गुरुकडून कान मंत्र घेणे आवश्यक नाही. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी सर्व इच्छा पूर्ण होत आहे. म्हणजे हरीचे चरणच सर्व विस्ताराचे मूळ खोड आहे.
