संसार तुकलिये वेव्हा
790.
संसार तुकलिये वेव्हारा मुकलिये ।
घराचारा पारूषलिये काय सांगो ॥१॥
माझे जिणेंचि बुडाले माझे जिणेंचि बुडाले ।
विठ्ठले कुडे केले काय सांगो ॥२॥
बापरखुमादेविवर विठ्ठले ।
सहज मोलेविणे विकत घेतले ॥३॥
अर्थ :
संसारा तुकलिये, ' म्हणजे संसारांत माझी स्थिती कशी झाली आहे म्हणून काय सांगू मी सर्वस्वी व्यवहाराला मुकले आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीपुढे गृह व्यापारापासून मी अगदी निराळी झाली आहे. पारमार्थिक दृष्ट्या माझे व्यवहारिक जिणेच बुडाले आहे. असे या विठ्ठलाने माझे संसारांत वाटोळे केले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने मला माझ्या जीवीत्वाचे काही एक मोल न देता मला आपलेसे करून टाकले असे माऊली सांगतात.
