नामेंचि पावले पैलपार
773.
नामेंचि पावले पैलपार । शुकादि साचार नामे जगी ॥१॥
ते नाम सोपे वाचे रामकृष्ण । उच्चिरतीं जाण वैकुंठ जोडे ॥२॥
नामे पावले मोक्षपद गती । नाम हे विश्रांती सर्व जीवां ॥३॥
एका जनार्दनी नाम हे तारका । वेदाचा विवेक रामनाम ॥४॥