शरीर संपत्ती मायेचे
780.
शरीर संपत्ती मायेचे टवाळ|वायांची पाल्हाळ मिरवितोसी|१|
नाम हेंचि तारी विठ्ठल निर्धारी|म्हणे हरी हरी एकी हेळा॥२॥
स्मरता गोपाळनाम वंदील काळयम|न लगती नेम मंत्रबाधा॥३॥
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम|राम हेंचि नाम स्मरे का रे॥४॥
