त्याचे पायी माझी बुध
791.
त्याचे पायी माझी बुध्दी ।
जडली कधी न ढळेची ॥१॥
ज्याचे ध्यानी मनी हरी ।
नामे वैखरी उच्चार ॥२॥
नित्य कीर्तनांचे घोष ।
करिती उल्हास आवडी ॥३॥
निळा म्हणे त्यांची गोठी ।
ऐकता पोटी सुख वाटे ॥४॥
791.
त्याचे पायी माझी बुध्दी ।
जडली कधी न ढळेची ॥१॥
ज्याचे ध्यानी मनी हरी ।
नामे वैखरी उच्चार ॥२॥
नित्य कीर्तनांचे घोष ।
करिती उल्हास आवडी ॥३॥
निळा म्हणे त्यांची गोठी ।
ऐकता पोटी सुख वाटे ॥४॥