वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

रामनामी भाव न धरिती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087588 · अभंग क्र. ७७७

777.
रामनामी भाव न धरिती कोणी । नाना मंत्र तंत्र घेती जनी ।
सकुडी कुंटणी वैकुंठासी नेली । अवचटे राम वदनी ॥१॥
रामनाम न मानिती जनी । सैर समाधि हरिकीर्तनी ॥धृ.॥
वारितां नाम प्रल्हाद स्मरे । त्याचे चुकविले नाना घात ।
कोरडिये काष्ठी नर मृग जाला । भक्ता साह्य जगन्नाथ ॥२॥
अभिलाषें नाम अजामेळ स्मरे । तो सोडिला यमकिंकरीं ।
मागील किल्मिष निःशेष जाळिलें । ऐसी नामाची ही थोरी ॥३॥
उफाराटे अक्षरीं रामु नारदमुनी । वाल्मिकासी उपदेशी ।
नष्ट वाटपाडा पुनीत जाला । या महाकवि म्हणविंती त्यासी ॥४॥
रामनाम कीर्तनी कैसे सुख आहे । हे शिवची जाणे साचे ।
दोचि अक्षरी काशी मुक्त केली । तारक ब्रह्मा हे त्यांचे ॥५॥
लाजेच्या संकटीं द्रौपदी नाम स्मरे । देवो वर्षला तिसी अंबरें ।
वैरी याचे शिरी पाउल आणिला । नामे भक्तकाज सरे ॥६॥
नामाचेनी बळे पाप पुढे पळे । कर्माकर्म तेथे जळे ।
एका जनार्दनी नाममात्रे । निजीं निजसुखाचे सोहळे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग